अकलुज – नुकत्याच पुणे येथे विभागीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या.यामध्ये शंकरनगर येथील मुलींनी रिले क्रिडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवित घवघवीत यश संपादन केले.
पुणे येथील बालेवाडी या ठिकाणी दि.२६ आँक्टोबर २०२५ रोजी भव्य मैदानी क्रिडा स्पर्धा पार पडल्या.यामध्ये राज्यभरातील चौदा वर्ष व एकोणीस वर्ष वयोगटाखालील शालेय मुलींनी सहभाग नोंदविला होता.
महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेच्या कु.अवनी नवगिरे, कु.जान्हवी खांडवे,कु.वैभवी ठोंबरे,कु.साक्षी निकम,कु.निता साठे व कु.सिध्दी ठोंबरे यांनी एकोणीस वयोगटातील ४/१००व ४/४०० रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर कु.गिरीजा पालकर,कु.अनुष्का शिंदे,कु.वैष्णवी कांबळे,कु.प्राजल सुर्यवंशी,कु.आदिती काळे यांनी चौदा वर्ष वयोगटात ४/१०० रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.
त्यांच्या या यशाबद्दल अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील,सचिव अभिजित रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे, स्थानिक प्रश्नाला समितीचे सभापती अँड.नितिनराव खराडे, मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यशस्वी खेळाडूंना प्रशालेतील क्रिडा शिक्षक प्रदिप पांढरे,अनिल मोहिते, आणि दादासाहेब सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी दि.१२,१३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी चिपळूण (देरवन)ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडणार असल्याचे प्रशिक्षक प्रदिप पांढरे यांनी सांगितले.तर अँड.नितिनराव खराडे यांनी स्पर्धेसाठी सुरु असलेला सरावाची माहिती घेत प्रशालेतील या यशस्वी खेळाडु देश पातळीवर ही यश मिळवतील अशी आशा व्यक्त केली.























