येथील समर्थ सदन येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दासनवमी विशेष महोत्सवानिमित्त झालेल्या कीर्तनात स.भ. ॲड .विद्यागौरी ठुसे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी पुर्वरंगात शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचा …नाशिवंत सर्व एक नाम साचे म्हणोनि वदा वाचे श्रीराम..या अभंगावर अभ्यासपुर्ण निरुपण झाले .श्रीराम नामाचा महिमा वेगवेगळ्या उदाहरणांवरून सांगत अनेक अभंगांचा ..दासबोधातील..गीतेतील संर्दभांच्या आधारे मुळ अभंग ऐकताना श्रोतृवर्ग भारावुन गेला.
याच विषयाला साजेशा उत्तररंगात नामावतारी संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातली नागपाशबंधनाचे आख्यान रंगवताना साकी ,दिंडी ,आर्या या काव्य प्रकारानी अलंकृत आख्यानात नामाचे अविनाशी महत्व भक्तांच्या मन:पटलावर कोरले गेले…विद्यागौरी ठुसे यांना यावेळी कीर्तनात तबला साथ विश्वनाथ पुरोहित व संवादिनी साथ बाळासाहेब चव्हाण यांची होती.
या प्रसंगी समर्थ सदनचे पदाधिकारी व जेष्ठ स.भ. शेंबेकर बुवा रामदासी , बाळू बुवा रामदासी समर्थ सदनचे व्यवस्थापक राजू व मुरलीधर कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, देसाई वहिनी ,संतोष वाघ, राजाभाऊ कुलकर्णी, रवी बुवा आचार्य ,अमोल शास्त्री, प्रतिष्ठित सातारकर आदि मंडळींची विशेष उपस्थिति होती.