पंढरपूर – एज्युकेशन सोसायटी संचलित द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे .रोटरी क्लब जुन्नरचे धनंजय राजूरकर, सागर ताजणे,डिसेंट फौंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई , सचिव एफ.बी.आतार , संचालक श्री.चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहकार्याने सॅनिटरी पॅड व्हेंडर व डिस्पॉसिबल मशीन दिले. प्रमुख अभ्यागतांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना भविष्यातील कारकिर्दीसाठी उत्तम मार्गदर्शन मिळाले.आपल्या जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना आपली समाजाप्रती असलेली कर्तव्य बजावणे हे ही महत्त्वाची बाब असते हे प्रमुख अभ्यागतांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. प्रमुख अभ्यागत धनंजय राजुरकर यांच्या प्रयत्नाने आपल्या प्रशालेसाठी विविध विद्यार्थी उपयोगी वस्तू दिल्या. सॅनिटरी पॅड व्हेंडर व डिस्पॉसिबल मशीन दिले. कळी उमलताना हे मुलींसाठी खूप उपयुक्त पुस्तक जितेंद्र बिडवई यांनी प्रशालेतील मुलींना भेट दिले. भविष्यातही रोटरी क्लब ऑफ इंडिया शाखा जुन्नर च्या माध्यमातून भरघोस मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. प्रशालेला सुसज्ज असे सुविधा असलेल्या वॉशरुम बांधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.डिसेंट फाउंडेशन च्या माध्यमातून भरघोस मदत करण्यात येईल असे सांगितले.सदर कार्यक्रमासाठी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. नानामालक कवठेकर, मानद सचिव आदरणीय गुरुवर्य सुधीर पटवर्धन, एस. पी. कुलकर्णी, संजय कुलकर्णी, डॉ. मिलिंद जोशी व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.कवठेकर प्रशाला नाथ चौकचे मुख्याध्यापक व्ही. वाय.पाटील ,उपमुख्याध्यापिका सौ.विश्वासे मॅडम,पर्यवेक्षक श्री.गडदे , श्री.शेलार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. लेंगरे, श्री. लेंगरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम. कुलकर्णी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय समीर दिवाण यांनी केला.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गुरुवर्य श्री.पटवर्धन यांनी राजुरकर परिवाराचे विशेष आभार मानले.कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक आर. एस. कुलकर्णी यांनी केले.सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक एस. एम. कुलकर्णी व सौ.फडके मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक बंधुभगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम केले.
हा कार्यक्रम प्रमुख अभ्यागत धनंजय राजूरकर, सागर ताजणे, डिसेंट फौंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई , सचिव एफ.बी.आतार, संचालक श्री.चव्हाण यांचे उपस्थितीत संपन्न झाला.



























