पंढरपूर – येथील द. ह. कवठेकर प्रशालेचा विद्यार्थी चि.जय योगेश अनेराव (इयत्ता ९ वी ‘ई’) याने पुणे व सोलापूर येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय गुणांक बुद्धिबळ स्पर्धेत (रॅपिड प्रकार) उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय गुणांक प्राप्त बुद्धिबळपटूंना पराभूत करत त्याने १४९० आंतरराष्ट्रीय इलो (ELO) गुणांक प्राप्त केला आहे.
या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक, परिवेक्षक व क्रीडा शिक्षक यांनी चि. जय याचे अभिनंदन केले असून, पुढील काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक यश मिळवून प्रशालेचे नाव उज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
















