मृग नक्षत्राच्या पावसाने सोलापूर शहर जिल्ह्यास अक्षरशः झोडपून काढले आहे शहरातील विविध सखल भागात पाणी साचून अनेक भाग जलमय झालेले दिसून आले त्यामध्ये संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काहींना मनस्ताप सहन करावा लागला. अशीच घटना रामवाडी परिसरातील असलेल्या मज्जिद या ठिकाणी घडली आहे या ठिकाणी राहणाऱ्या महिलेला पावसाचा जबरदस्त तडाखा सहन करावा लागला आहे.
संत धार पावसामुळे घरात पाणी शिरले अन्न नाही पाणी नाही चार रात्री अशाच बसून जागून काढल्या अशी विदारक व्यथा महिलेने यावेळी मांडली. दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे काम झाले रस्ता करतेवेळी घरासमोर चढ निर्माण झाला आणि घर खाली गेले यामुळे पावसाचे पाणी वारंवार घरांमध्ये साचते. पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवासीयांनी शेवटी थकून पाण्यातच दिवस-रात्र काढली. दरम्यान याकडे महापालिका प्रशासन आणि अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत असून महिलेसह कुटुंबीयांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे.
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते देविदास गायकवाड यांनी कुटुंबीयांना भेट देत प्रशासनाला जागे केले आहे महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना केली नाही तर महापालिकेत टाळे ठोकू असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. आसपासच्या नागरिकांनी या परिवाराला सहाय्य करत जेवण आणि पाणी दिले यावरच त्यांनी दिवस काढले आहेत परंतु महापालिका प्रशासनाने माणुसकी सोडून दिली आहे का असा आहेत प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.