लातूर / चाकूर – तालुक्यातील कलकोटी ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा योजनेंतर्गत २०२३-२५ मध्ये झालेल्या कामांतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ग्रामस्थांनी २९ ऑक्टोबर रोजी पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. या प्रकरणी चौकशी समितीच्या चौकशी अहवालानुसार तात्कालिन ग्रामसेवकाला निलंबित करून सरपंचासह मनरेगातील तीन कर्मचारी सागर धैर्य,अमोल कुमठेकर, नितीन जाधव याना कारणे दाखवा नोटीस देऊन मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी खुलासा मागवला आहे.
चौकशी समितीचे लातूरचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांनी प्रथमदर्शनी पाच गोट्याची चौकशी केली असून चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला दाखल केला असता गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तात्कालिन ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केले असल्याची माहिती दिली.
लेखी पत्रानंतर उपोषणकर्ते दिपक मुर्के,प्रदीप कांबळे, मधुकर कोंपले, सुधाकर कोंपले,बाबू चवरे, नारायण कांबळे यांनी उपोषण सोडले.यावेळी कलकोटी येथील लक्ष्मण तिकटे, दयानंद मुर्के,वैजनाथ कोंपले, प्रभाकर जाहगीरदार, घनश्याम हाके, उद्धव कोंपले, काशिनाथ हेमनर, विठ्ठल कांबळे उपस्थित होते.




















