सोलापूर – जेवण करून शतपावले करणाऱ्या एकास शिवीगाळ हत्याराने डोके, मानेवर मारून जखमी केले,यामध्ये तिघे जण जखमी झालेले आहेत.याप्रकरणी संशयित चौघांवर जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत अभिषेक आनंद वडतिले (रा. मराठी वस्ती सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल शिंदे, विठ्ठल कोळी, खंडू वाघमारे, दशरथ शिंदे (रा. मराठा वस्ती सोलापूर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
१३ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास मराठी वस्ती येथे फिर्यादी जेवण करून फिरत होते. फिरत असताना त्यावेळी राहुल शिंदे हा दारू पिवून आला होता व फिर्यादीची गच्ची पकडून तुमच्या लोकांना मस्ती आली आहे. असे म्हणत हाताने मानेवर चापट मारली, अभिषेक वडतिले याचे काका कैलास व काकू रुपाली यांनी येवून भांडण सोडवले. अभिषेक घरी आला. त्यावेळी आरोपीही मराठा वस्ती या ठिकाणी येवून शिवीगाळ करू लागला, व भांडण मिटवू चौकात चला असे म्हणाला त्यावेळी अभिषेकचा काका कैलास व भाऊ विक्रम हे दोघे मराठा वस्ती या ठिकाणी गेले, राहुल शिंदे याने खिशातून कसलेतरी हत्यार काढून फिर्यादीच्या डोक्यात,डाव्या हाताच्या बोटावर मारून दुखापत केली आहे. तसेच अभिषेकचा काका कैलास व भाऊ विक्रम यांच्या डोक्यातही मारून दुखापत केली आहे. या प्रकरणाचा तपास सहा फौजदार ओव्हळ करीत आहेत.