सोलापूर – शेतामध्ये सर्पदंश झालेल्या चिवरी गावच्या महिलेचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला.
शोभा किसन गवळी (वय 55 वर्ष, रा. चिवरी, तालुका तुळजापूर ) असे त्या मयत महिलेचे नाव असून त्या सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी घराजवळील शेतात असताना त्यांच्या पायास सापाने चावा घेतला होता. त्यामुळे त्यांना नळदुर्ग च्या आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून येथील शासकीय रुग्णालयात संध्याकाळी पती किसन यांनी दाखल केले असता या महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला.
पतीच्या मारहाणीत जखमी झालेल्या हवेली तालुक्याच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
सोलापूर – घरगुती भांडणातून पतीच्या मारहाणीत जखमी झालेल्या हवेली तालुक्यातील महिलेचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात शनिवारी रात्री मृत्यू झाला.
सुशीला बिरप्पा खांडेकर ( वय 39 वर्ष ,रा. गावडेवाडी, ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा. वाघोली, ता. हवेली. जिल्हा पुणे ) असे त्या मयत पत्नीचे नाव आहे. त्या सहा ऑक्टोबर रोजी वाघोली शिवारातील केसनंदगावात असताना घरगुती भांडणाच्या कारणावरून पती बिरप्पा खांडेकर याने तिला लाकडाने मारहाण केली होती. यात डोकीस जखम, दोन्ही हाताला मार लागल्याने तिच्यावर खाजगी दवाखान्यात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात दुसऱ्या दिवशी पहाटे भाऊ सिद्धप्पा याने बेशुद्ध अवस्थेत दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री दहा वाजता मृत्यू झाला.