राज्यातील शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाच्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची आतुरता आता संपणार आहे.
20 हजार जागांसाठी जाहिरात निघणार :
शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना 20 हजारांहून अधिक जागांची जाहिरात निघणार असल्याने हा एक प्रकारचा दिलासाच असणार आहे. आज दुपारनंतर ही जाहिरात दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या सुमारे 1 हजार खासगी शिक्षण संस्थांमधील 20 हजारांहून अधिक जागांसाठीच्या जाहिराती आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या शिक्षक भरती अंतर्गत जिल्हा परिषदेसोबतच खासगी शिक्षण संस्थेच्या जागांवरसुद्धा पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.