अहो साहेब गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडे लक्ष द्या हो, चिमुकल्या विद्यार्थ्यांची गाव पुढाऱ्यांना हाक…!
हाणेगाव प्रतिनीधी /फारुख पटेल: हाणेगाव येथील गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत फारच वाईट अवस्था झाली असुन याकडे कोणताच लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही. मागील पंचवार्षीक लोकसभा निवडणुकीत याच रस्त्यावरुन गावात येऊन प्रचार करुन भाजपचे खासदार निवडुन आले पाच वर्षाचा कार्यकालच संपला पण त्यांनी काही केला नाही
मग देगलुर विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार साहेब याच रस्त्यावरुन गावात येऊन प्रचार करुण निवडुन आले त्यांचा ही कार्यकाल संपुष्टात येत आहे त्यांनी ही काही या रस्त्यासाठी निधी दिला नाही नुकतेच लोकसभा निवडणूका झाले कांग्रेसचे उमेदवार निवडून आले त्यांनी तर याकडे लक्ष देऊन रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन द्यावी अशी नागरीकांत चर्चा आहे.
तालुक्यात सर्वात मोठी १७ सदस्यीय ग्रामपंचायत असुन एक मोठं लोकवस्तीच गाव आहे गावात जाणारा मुख्य प्रवेशद्वार रस्ता हाच असुन येथूनच संपुर्ण शासकीय कार्यालय,बेंक, जि.प.हा.शाळा,कन्या शाळा,सा.फुले शाळा,डाक घर, ग्रामपंचायत,तलाटी कार्यालय,दवाखाना,बाजारपेठ,पोलीस चौकी,आदी कार्यालयाकडे जावावं लागतो तर आनेक गावांना जोडणारा जोड रस्ता देखील हाच आहे हे सर्व असुन सुद्धा याकडे कोणताच लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही.
लहान चिमुकले विद्यार्थी याच रस्त्यावरुन चालताना आपला जिव मुठीत धरुन शाळेला जात असतात तर वयोवृद्ध,आजारी लोकांना हा रस्ता मृत्युचा सापळाच वाटतो आहे पावसाळा असल्यामुळे येथील रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळेनासे झालं आहे म्हणुन चिमुकल्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की गाव पुढाऱ्यांनी या रस्याकडे लक्ष देऊन संबंधीत बांधकाम विभागाशी संपर्क साधुन लवकरात लवकर रस्ता बनवावा अशी चिमुकले विद्यार्थी चर्चा करीत आहेत