Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुण्यात निवडणूक विषयक समन्वयक अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 3, 2024
in maharashtra
0
पुण्यात निवडणूक विषयक समन्वयक अधिकाऱ्यांची बैठक संपन्न
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी कामासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. पात्र व्यक्तींची मतदार नोंदणी आणि नोंदणी झालेल्या मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यावर भर द्यावा, निवडणूक प्रक्रिया उत्तमरीतीने पार पाडण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी दिले.

बैठकीला मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, शिरूर निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि विविध विषयांचे समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार सर्व कामे वेळेवर होतील याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. निवडणूक आयोगाने दिलेली कालमर्यादा पाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आणि क्षमतेने काम करावे. चारही मतदारसंघात जबाबदऱ्यांची मानके किंवा नमुने ठरवून त्यानुसार काम करावे. दिव्यांग मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधेचे नियोजन करावे.

एकाच ठिकाणी पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असल्यास अशा ठिकाणी स्वयंसेवकांची मदत घ्यावी. पुणे शहरात प्रत्येक प्रभाग कार्यालयात मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी सुविधा करण्यात यावी. महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करतांना त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा मिळतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी कळसकर यांनी सादरीकरणाद्वारे निवडणूक पूर्वतयारीची माहिती दिली. बैठकीत मतमोजणी स्थळ, वाहतूक आणि संवाद आराखडा, दिव्यांग मतदारांसाठी सुविधा, निवडणूक विषयक विविध प्रकारचे प्रशिक्षण, निवडणुकीसाठी मनुष्यबळ, निवडणूक खर्चाबाबत दर निश्चिती, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी आदीविषयक आढावा घेण्यात आला.

Post Views: 48
Previous Post

भारत जोडण्यापेक्षा पक्ष जोडावा, रामदास आठवलेंचा राहुल गांधींना टोला

Next Post

फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी, मुख्य आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी, मुख्य आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी, मुख्य आरोपीला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

दोन गटाच्या मारहाणी मध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.#viral #marathinews #public

February 15, 2026

तांदुळवाडी मध्ये महिला मेळावा संपन्न.#public #solapurnews #viral #trending

February 15, 2026

बदनापूर मध्ये गुटख्याच्या साठ्यासह अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल व वाहन जप्त.#public #marathinews

February 15, 2026

अमृतेश्वर गोमुख संस्थान मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन.#viral #solapurnews #public

February 15, 2026

भोकरदन तालुक्यात मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड.#viral #public #tranding

February 15, 2026

डॉ. सुधा फडके यांचे निधन..#viral #public

February 15, 2026

टिपू चे कौतुक केल्याबद्दल सपकाळांवर गुन्हा दाखल.#viral #पब्लिक #public

February 15, 2026

माहूर मध्ये मासरेड अंतर्गत अवैधरित्या हातभट्टी दारूचे दोन अड्डे उद्ध्वस्त..#viral #पब्लिक

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0682284

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697