अक्कलकोट – लोकमंगल ने आर्थिक शिस्त आणि सभासदांच्या हिताचा विचार केल्यामुळेच संस्थेची प्रगती झपाट्याने झाली आहे. सभासद हेच संस्थेचे खरे मालक असून ते जर जागृत असतील तर कोणत्याही संस्थेला धोका निर्माण होणार नाही. म्हणून सभासद मालकांनी नेहमीच लोकमंगल बँक व पतसंस्थेच्या संपर्कात राहून अडचणी समस्याचे निराकरण करावे असे आवाहन लोकमंगल परिवाराचे संस्थापक माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
लोकमंगल परिवाराच्यावतीने अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात दिवाळी फराळाचे आयोजन आणि स्नेह मेळावा मोठ्या जल्लोष्यात साजरी करण्यात आला.
प्रारंभी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी लोकमंगल पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला.याप्रसंगी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले लोकमंगल बँक आणि लोकमंगल पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक विविध योजनांना अर्थ पुरवठा केला जातोय या माध्यमातून अनेकांनी आपले उद्योगधंदे आणि रोजगार निर्मिती केली आहे. लोकमंगल्ये महिलांच्यासाठी अनेक आर्थिक योजना सुरू केल्या आहेत याचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनल्यास समाज देखील संपन्न होऊ शकतो.
महाराष्ट्र शासनाचा योजनाच्या माध्यमातून १२% व्याज परतावा कर्ज योजना सर्व प्रकारच्या व्यवसायाकरिता बँकेकडून आर्थिक साहाय्य सुरु आहे. या करिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना अंतर्गत, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ योजना , महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ योजना अंतर्गत, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) अंतर्गत, ए ए आय पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजिकांचे सक्षमीकरण साठी शासनाकडून व्याज प्रतवा कर्ज योजना मिळवून देण्यांची योजना चालू आहे. तसेच सर्व प्रकारच्या अन्न प्रक्रिया व्यवसायासाठीकर्ज उपलब्ध होईल आणि प्रधानमंत्री फुड प्रोसेसिंग योजने अंतर्गत ३५% पर्यंत सबसीडी पण शासनकडून मिळणार आहे.या सर्व योजनासाठी कमाल कर्ज मर्यादा रक्कम रू. १५ लाख रु पर्यंत मर्यादा आहे.अधिक माहितीसाठी रामचंद्र शिवपूजे – ९८२३६११८९९, पुरुषोत्तम शिंदे ९८९००४७४७१, सागर शिंदें – ९६७३६५७५७३, परमेश्वर जाधव – ८९८३४५२१३१ यांच्याशी संपर्क साधावी अशी आवाहन लोकमंगल मॅनेजर महादेव कोळी यांनी केली आहे.
याप्रसंगी बँक आणि पतसंस्थेच्या अनेक सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संस्थेच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रवीण शहा शिवशरण जोजन, शिवशरण वाले , दयानंद बिडवे, ,सुभाष गडसिंग,निलप्पा घोडके,अतुल जाधव ओम प्रकाश तळेकर बाळासाहेब कलशेट्टी मल्लम्मा पसारे ,सौ.सुवर्णा साखरे, सौ.वर्षा चव्हाण, बाके श्रीकांत सोमवंशी, शाखाधिकारी सविता लोकापुरे,स्वप्ना कदम, सिंदलिंग लालशेरी, सागर शिंदे सूत्रसंचलन सतिश लोंढे यांनी केले.
आमदार सुभाष देशमुख यांची सदिच्छा भेट ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याण शेट्टी यांनी प्रविण शहा यांच्या निवासस्थानी घेतली आणि राजकारणा पलिकडचे ऋणानुबंध जपले.
 
	    	 
                                


















 
                