भोकर / नांदेड – पक्षाच्या वतीने सर्व वार्डातील इच्छूक उमेदवारांचा सर्व्हे करण्यात आला सर्व्हेक्षनाचे ठरलेल्या मेरिटमध्ये आल्यानंतरही उमेदवारांना डावलल्याने इच्छूकांचा हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले. नाराज झालेले उमेदवार बंडाचे निशाण हाती घेवून आपले भविष्य अजमावित आहेत.
भोकर नगरपरिषदेची निवडणूक चूरशीची होत असून भाजपा, काँग्रेस,दादांची राष्ट्रवादी, वंचित, एमआय एम, आदि पक्षाने आपले तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले भोकर नगरपरिषदेवर मागील दहा वर्ष काँग्रेसचे वर्चस्व राहिले माजी मूख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात आल्यानंतर त्यांचे असंख्य कार्यकर्ते भाजपात प्रवेश केले भोकर शहरात भाजपाचे वर्चस्व नसताना काही कार्यकर्ते पक्ष सोडले नाही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले अशा कार्यकर्त्यांचा होवू घातलेल्या नगरपरिषद निवडणूकित विचार केला जाईल असे वाटत होते पण अचानक आलेल्या कार्यकर्त्यांचा विचार करण्यात आल्याने पक्षनिष्टा बाळगणार्यांचा शेवटी हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले काही असंतूष्ट उमेदवार बंडाचे निशाण फडकवत दूसर्या पक्षाकडून उमेदवारी मिळवली तर काहीजन तटस्थ असल्याचे दिसून येते उमेदवारांचे तिकिट कापल्याने ते कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करतील हे निकालानंतर निदर्शनास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सर्वच राजकिय पक्षातील काही निष्ठावंत नाराज झाल्याचे पहावयास मिळाले काही प्रभागात दूरंगी तर काहि ठिकाणी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असताना काँग्रेस व भाजपाने ओबिसी चेहरे दिले तर दादांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहूजनांचे नेते एक राजकारणातील अनूभवी व्यक्तीमत्वाला उमेदवारी देवून तगडे आव्हान उभे केले शिवसेनेने देखील आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी यामध्ये लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे दादांच्या राष्ट्रवादीकडे मतदारांचा कौल सद्यातरी पहावयास मिळत असून अनेक नगरसेवक यावेळी निवडूण येण्याची शक्यता दिसून येते काही प्रभागात प्रभावी उमेदवार दिल्याचे पहावयास मिळत आहे काही प्रभागात जूनेच चेहरे असल्यामूळे तेथील मतदार बदल हवा असे बोलत आहेत.अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्वच पक्षांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.मतदार शेवटी कोणत्या उमेदवारांच्या बाजूने कौल देतील हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.



















