वाळूज महानगर (प्रतिनिधी )- विविध कार्यकारी संस्थेने शेतकर्याचे हित जोपासण्याचे काम करावे.त्यासाठीच जिल्हा सहकारी बॅकेने संस्थेला कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.मागणीनुसार आणखीही कर्जपुरवठ्यात वाढ करण्यात येईल असे आश्वासन सहकारी बॅकेचे संचालक तथा गंगापूर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पा. डोणगावकर यांनी गुरूवार (दि.15) रोजी कार्यक्रमात दिले.
जिल्हा सहकारी बॅकेतर्फे वाळूज विविध कार्यकारी संस्थेला 15 लाखाचा कर्जपुरवठा करण्यात आला.त्यातून संस्थेची सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार आहे.बांधकामाचे भुमिपुजन गुरूवारी कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले की,संस्थेच्या मालकीची आज प्रशस्त जागा असून त्याचा फायदा नक्कीच संस्थेने घ्यावा.वेगवेगळ्या सुविधा सुरू कराव्यात. इमारतीचे काम हे चांगल्या दर्जाचे झाले पाहीजे. गरज पडल्यास कर्जात वाढ करण्यात येईल
असे सांगून त्यांनी तालुक्यातील लिप्ट योजना लवकरच सुरू करण्यात येईल.साखर कारखान्यावर जरी कर्जाचा डोंगर असलातरी येत्या पाच वर्षात कर्जमुक्त कारखाना करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन मुकेश बोहरा होते.यावेळी सहकारी बॅक शाखेचे भागचौकसनीस अरूण ढोले,लोण ऑफीसर एस.आर.वाघ,हिशोबनीस सी.पी. सुलाने, व्हा.चेअरमन सईदा पठाण,उपसरपंच योगेश आरगडे,संचालक उदय पाटील,शेख जमील, काकासाहेब चापे, ज्ञानेश्वर बोरकर,भिकचंद देसाई, जनार्दन देवकर यांच्यासह शरदचंद्र अभंग,रमेश भवार,संजय खोचे,सर्जेराव भोंड,विजय साबळे,सुधाकर वाघमारे,सचिव रमेश सांळूके,शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन संस्थेचे संचालक बी.आर.गायकवाड यांनी केले.