वाळूज – मोहोळ तालुक्यातील वाळूज हे भोगावती आणि नागझरी नद्यांच्या संगमावर वसलेले वाळूज हे गाव. वर्षानुवर्षे निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधी येतात, “लवकरच पूल उभा राहील” अशी आश्वासने, आणि निवडणुका संपताच ती आश्वासने विसरतात. दरवेळी आशा निर्माण होते, आणि पुन्हा तीच निराशा. भोगावतीनदी मुळे गावाची दोन भागात विभागणी झाली वाळूज–कळमण -सोलापूर रस्त्यावर अद्यापही पूल बांधला गेलेला नाही गावाचा पूर्वभाग नदीच्या पलीकडे जाधववस्ती असून या नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात तसेच बंधाऱ्याची दारे टाकून पाणी अडविल्यानंतर ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत .
देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना वाळूजसारख्या गावांना आजही मूलभूत सुविधांची कमतरता भासते. पुलाच्या अभावामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नदीला पूर आल्यावर वाहतूक बंद होते, येथील ग्रामस्थांना दैनंदिन दळणवळणासाठी वाळूज गाठावे लागते. परंतु, नदीला पावसाळ्यात पूर आल्यानंतर अडकून बसावे लागत आहे. विद्यार्थ्याना शाळेला जाणे-येणे अवघड होते. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही अशा स्थितीत विद्यार्थी काय शिक्षण घेणार? असा प्रश्न पालक वर्गाकडून होत आहे
गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. पुलाअभावी शेतमाल बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांना लांबचा पर्यायी मार्ग वापरावा लागतो. त्यामुळे वाहतूकखर्च वाढतो आणि वेळ व श्रम दोन्ही वाया जातात. “पूल नसल्याने पिकांची विक्री करताना आम्हाला नुकसान होते, आजारी रुग्णांना दवाखान्यात नेणे अशक्य बनते,गावातील ग्रामस्थांना पर्याय नसल्यामुळे नदीमधूनच वाट शोधत पुढे जावे लागत आहे.
या नदीवरील पुलाचे बांधकाम करून शेतकरी, विद्यार्थी, महिला रुग्ण,कामगार, ग्रामस्थांची अडचण दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे, पण लोकप्रतिनिधी आणि शासनाकडून याकडे अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मागण्यांनंतरही या नदीवर पूल बांधकामाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. शासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रिय भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला असून संयम संपत चालला आहे शासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे.
Byte-
वाळूजच्या भोगावती-नागझरी संगमावर पूल नाही प्रश्न असा आहे की,
लोकप्रतिनिधींनी ही वस्तुस्थिती किती वेळा पाहिली आणि किती वेळा विसरली?
आणि हा केवळ एका गावाचा प्रश्न नाही — हा शासनाच्या निष्क्रियतेचा, लोकप्रतिनिधींच्या बेफिकीरीचा दुर्लक्षित वास्तवाचा चेहरा आहे.ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही जर शासन आणि प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत असतील, तर ही केवळ प्रशासनाची अपयशकथा नसून, लोकशाहीवरील विश्वासालाही धक्का आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आमच्या गावात पूल नाही, ही खेदजनक गोष्ट आहे. हे शासन आणि लोकप्रतिनिधी दोघांचं अपयश आहे.”
– सुधीर मोटे
“पावसाळा सुरू झाला की आमचं आयुष्य थांबतं. नदीला पूर आला की गावाशी संपर्क तुटतो. प्रत्येकवेळी जीवावर खेळून होडीतून प्रवास करावा लागतो. आमच्या शेतीमालाचं नुकसान होतं. बाजारात पोहोचण्यासाठी लांब वळसा घ्यावा लागतो आणि ट्रॅक्टरचं भाडं दुप्पट लागतं,होडीतून प्रवास करताना मुलांना घेऊन जाणं म्हणजे भीतीदायक प्रसंग असतो. शासनाने तातडीने पूल बांधकामाची प्रक्रिया सुरू करावी.”
-आण्णासाहेब मोहोन कादे




















