श्रीपूर – आजच्या सामाजिक स्थिती कडे पाहीले असता दुरदर्शन वरील संस्कृतीहीन मालिका , सात्विक आहाराचा अभाव , विहारातील बदल , यामुळे समाजाचे अधःपतन होत असल्याचे चित्र दिसून येते . यावर एकमेव उपाय म्हणजे संतानी दाखवलेल्या भक्तिमार्गाने वाटचाल केली तरच जीवन समृद्ध होणार असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध किर्तनकार संध्याजी पाठक (पोतदार ) ,यांनी केले .
श्रीपूर येथिल श्रीराम भक्त मंडळाचे वतीने ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त आयोजित किर्तन महोत्सवात केले .
सामाजीक परिस्थितिचे अवलोकन करत असताना आज धर्माचा प्रचार करणाऱ्यांची संख्या जास्त दिसते परंतू आचरण करणारे खूप कमी आहेत . जे परिपूर्ण व सिद्ध आहेत त्याची कृपा झाली तरच या भवसागरातून आपण तरून जाऊ . प्रसिद्ध असणे व सिद्ध असणे यात फरक आहे . ब्रम्हचैतन्य गोंदवले महाराज हे सिद्ध पुरुष होते म्हणून त्यांनी सांगितलेल्या भक्तिमार्गाने वाटचाल करणे महत्वाचे आहे . मार्ग निवडताना डोळस असावे त्यानंतर डोळे झाकून चालले तरी भगवंत पाठीशी असतो .
तीन दिवस चाललेल्या महोत्सवाची शुकवार दि . ३० रोजी गुलाल , पुष्पवृष्टी व महाप्रसादाने किर्तन महोतसवाची सांगता झाली .
महोत्सव पार पाडण्यासाठी हरीभाऊ कुलकर्णी , गजानन मोकाशी , संतोष जोशी , हरीभाऊ वसेकर , तुकाराम केसकर , सुरेश पुराणिक , सिमा पुराणिक , तुकाराम सुमंत यांनी परिश्रम घेतले .
– – – – – – – – – – – – – – – – – – – = – – – – – – – – – – – – – – – – – – – – संस्कारित पिढी निर्माण करणे महिलांच्या हातात – –
आज टी . व्ही . सिरिलिअलच्या माध्यमातून उज्वल असणाऱ्या संस्कृतीस चित्र विचित्र प्रसंगातून धोका पोहोचवला जात आहे परंतू हा धोका फक्त प्रातिव्रत्य या गुणांच्या माध्यमातून भारतीय स्त्री रोखू शकते . म्हणूनच संस्कारित पिढी निर्माण करणे महिलांच्य
हातात आहे . स्त्री शक्तीचे सामर्थ्य यातूनच दिसते .
संध्याजी पाठक .


























