सांगोला – लोकमंगल समुहाच्या प्रत्येक संस्थेवर ग्राहकांचा असलेला विश्वास हीच लोकमंगलची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन माजी सहकार मंत्री लोकमंगल समुहाचे संस्थापक आ.सुभाष देशमुख यांनी केले. ते सांगोला येथील लोकमंगल बँक व पतसंस्थेच्यावतीने आयोजित दिवाळी फराळ व स्नेहसंवाद कार्यकमात बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक विजय कुलकर्णी होते.
यावेळी बँकेचे सल्लागार व लोकमंगल पतसंस्थेचे संचालक ऍड.गजानन भाकरे यांनी लोकमंगल समुहाच्यावतीने राबविण्यात येणा-या सामुदायीक विवाह सोहळा, निराधारांना मोफत घरपोच डबे, अन्नपुर्णा योजना, समृद्ध गाव योजना, वृक्ष लागवड आदी विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून लोकमंगल समुह व आ.सुभाषबापू देशमुख यांचेवर विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविकात बँकेचे सांगोला शाखा व्यवस्थापक ऍड.शिवाजी दरेकर यांनी बँकेच्या प्रगतीचा अहवाल सादर करून विविध कर्ज योजना, पर्यटन सप्ताह याची माहीती दिली. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँक कर्मचारी सुहास वालिकर, पृथ्वीराज पवार, विजय स्वामी, ज्योती गुळमिरे, सागर महामुनी, पतसंस्थेचे विभागीय अधिकारी वैभव लांबोरे, शाखा अधिकारी दत्तात्रय दिवसे, ऐश्वर्या दौंडे, स्नेहल साळुंखे, विकास खुळपे, साहिल काळे, फडके यांनी परिश्रम घेतले.
लोकमंगल बँक, लोकमंगल पतसंस्था व लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटी या तिन्ही वित्तीय संस्थानी अर्धा महाराष्ट्रभर विस्तार केलेला आहे. राज्य शासन, केंद्र शासन व भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या मार्गदर्शक तत्वांचे नियमित व कडक पालक करून आर्थिक शिस्त ठेऊन कामकाज करीत आहोत. त्यामुळे लोकमंगल समुहाने ग्राहकांचा विश्वास संपादीत केलेला आहे.
– आ.सुभाषबापू देशमुख, संस्थापक, लोकमंगल समूह
 
	    	 
                                




















 
                