सांगोला – येथील उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्टेज पूजनाने करण्यात आली.
इ.१ च्या चिमुकल्यांनी स्वर्गातून आली आकाशगंगा या गाण्यावर आधारित नृत्य सादर केले. तसेच पौष्टिक आहारावर आधारित गाण्यावर सादर केलेल्या नृत्यातून आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. याशिवाय बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम व आपुलकी दर्शविणाऱ्या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. इ.२ च्या विद्यार्थ्यांनी पावसाचे गीत, कोळीगीत व डोंबारी नृत्य सादर करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. इ.३ च्या विद्यार्थ्यांनी एक दिन बीक जायेगा या गीतावर भावपूर्ण नृत्य सादर करून जीवनाचा संदेश दिला. तसेच लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने रंगमंच उजळून निघाला. देवीच्या आई आंबे या गाण्यावर सादर केलेल्या टिपरे नृत्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
इ.४ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शंभूराजांच्या गाण्यावर जोशपूर्ण नृत्य सादर केले. त्यानंतर सादर केलेल्या आकर्षक कटपुतली नृत्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले, तर महादेवाच्या तांडव नृत्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय व ऊर्जायुक्त झाले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विश्रांती मागाडे, उपमुख्याध्यापिका स्वराली कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी प्रसाद लोखंडे, शिक्षिका शुभांगी कवठेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
इ.२ च्या विद्यार्थ्यांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करणारे इंग्रजी नाटक सादर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. इ.३ च्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आधारित हिंदी नाटक सादर करून समाजप्रबोधन केले. तर इ.४ च्या विद्यार्थ्यांनी भातुकली नाटक सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.


























