कुर्डूवाडी – शेतक-यांची शेतीविषयक अवजारासाठी लागणारे दाखले, विद्यार्थ्यांचे उत्पंन्नाचे दाखले,सर्वसामान्यांना आरोग्याच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले,7/12 च्या नोंदी,वर्ग दोनच्या वर्ग एक नोंदी ,वारसाच्या नोंदी असतील याबाबत नागरीकांच्या अनेक तक्रारी असून याबाबत महसूल विभागाने संवेदनसिलता ठेवून लवकरात लवकर विलंब न लावता सर्वांची कामे करावीत असे म्हणून शासन नियम सुरळीत व सुटसुटीत असल्याने गावोगावचे पानंद रस्त्यासाठी महसूल विभागाने जास्तीत जास्त काम करून सर्व रस्ते किमान रेकाँर्डवरती तरी घ्यावेत असे प्रतीपादन करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.
@ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी सोलापूर व तहसीलदार माढा यांचे मार्गदर्शनाखाली दि. 14.मार्च.2026 रोजी मंडळ अधिकारी कार्यालय निमगाव टें ता.माढा येथे समाधान शिबिर आयोजित केले होते त्यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे बोलत होते यावेळी व्यासपिठावर जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, पंचायत समिती सभापती पंडीत देशमुख, उल्लास राऊत, सदस्य प्रतिनीधी दिगंबर माळी,नायब तहसिलदार पांडूरंग भडकवाड,निवासी नायब तहसिलदार विजय कवडे,संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार लक्ष्मण पवार,विस्तार अधिकारी ए.टि.शिंदे, मंडलअधिकारी संदिप लटके, ग्रामविकास अधिकारी नवनाथ दोंड, निमगाव टें ग्राम महसूल अधिकारी प्रिती काळे,शामल जमादार,सिध्देश्वर घुघे, चंद्रकुमार बुटे, श्रावण भोये उपस्थीत होते. प्रथमता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पुजन नूतन पं.स.सभापती पंडीत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
@ पुढे बोलताना संजयमामा शिंदे म्हणाले “, पुर्वी तालुक्यात कुठेतरी एखादा कँन्सरचा पेशंट असायचा आता गावोगावी दहा घराआड एक पेशंट आढळच आहे त्यामुळे सर्वांना या आजाराचा खर्च करणे पेलत नाही त्यासाठी अशा पेशंटला शासकीय योजनेची मदत घ्यावी लागते त्यामुळे त्यांना उत्पंन्नाच्या दाखल्याची आवशक्यता असते त्यावेळी संवेदनसिलता ठेवून त्यांना दाखले द्यावेत असे म्हणून शहरीकरण व यात्रीकीकरणामुळे जमिनदार ते शेतकरी -अल्पभूधारक -अत्यल्पभूधारक -त्यानंतर भूमिहीन अशी शेतक-यांची अवस्था झाल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी सभापती पंडीत देशमुख यांनीी मार्गदर्शन केले.
दर शिबिरात दिलेल्या लाभांची आकडेवारी पुढीलप्रमाणे उत्पन्न दाखले 71 जात प्रमाणपत्र 7 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र 16 प्रतिज्ञापत्र 46 सातबारा उतारे 126 8अ उतारे 71 श्रावण बाळ प्रकरणे 8 वारस नोंद प्रकरण 1 अपाक शेरा कमी करणे प्रकरण 1 अशा प्रकारच्या सेवा सर्व विभागाअंतर्गत नागरीकांना यावेळी देण्यात आल्या.सदरचे शिबिर हे निमगाव ते मंडळातील सर्व गावातील नागरिकांसाठी शेतकरी नागरिक यांच्यासाठी आयोजित केले होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक ग्राम महसूल अधिकारी प्रिती काळे यांनी तर आभार नायब तहसिलदार विजय कवडे यांनी केले.
@ चौकट—
–अभियानांतर्गत प्रमुख दिल्याजाणाऱ्या-सेवा–
प्रलंबित फेरफार, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघना बाबतच्या प्रकरणांचा निपटारा, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप, पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र अॅग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी, अकृषिक (छअ) परवानगी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत केली जाणार, अकृषिक (छअ) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे.























