मुदखेड / नांदेड – मुदखेड नगरपरिषद निवडणूकीचे वातावरण सध्या तापले असून इच्छूकांमध्ये कोणाला टिकीट मिळणार याकडे सर्व मतदाराचे लक्ष लागले आहे.
कारण भाजपाकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत पार पडली.
आणि नुकतीच कॉंग्रेस पक्षाकडून सुध्दा इच्छूक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
यामध्ये काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून एकाच नावाची चर्चा खूप झाली होती.
पण त्या चर्चेमध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार आल्याने जनतेमध्ये वेगळाच सुर ऐकायला मिळत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक टिकटासाठी असलेली गर्दी खरोखरच तीव्र आहे.
भारतीय जनता पार्टीने फक्त एका उमेदवाराला टिकट दिल्यामुळे बाकीचे सगळे निराश होणार हे स्पष्टच आहे. पक्षाच्या आंतरिक प्रक्रियेत अनेकदा एक तिकीट, अनेक दावेदार असा समीकरण असतो, त्यामुळे इच्छूकांमध्ये उत्सुकता आणि निराशा दोन्ही वाढते.
पक्षाच्या पक्षश्रेष्टीच्या सहमतीने, सर्व इच्छूक उमेदवारांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतरच एका नामांकनावर सहमती बनते, ज्यामुळे बाकीचे दावेदार बाहेर पडतात.
जेव्हा एका उमेदवाराला टिकीट मिळते, तेव्हा त्याच्या समर्थकांमध्ये उत्साह असतो, पण टिकट न मिळालेल्यांच्या समर्थकांमध्ये निराशा आणि कधीकधी विरोधही दिसून येतो.
त्यामुळे पक्षाचे पक्षश्रेष्ठी कोणाला तिकीट देतील आणि यामध्ये कोणाच्या पदरात निराशा पडेल याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

























