Sunday, March 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दगड खाणीतील पाण्यात बुडालेल्या ‘यश’चा शोध अद्यापही निष्फळ

तरुण भारतbyतरुण भारत
March 15, 2026
in crime
0
दगड खाणीतील पाण्यात बुडालेल्या ‘यश’चा शोध अद्यापही निष्फळ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील दगड खाणीच्या पाण्यात बुडालेल्या श्रीहर्ष उर्फ यश श्रीहरी हब्बू या चौथीतील विद्यार्थ्याचा शोध तिसऱ्या दिवशीही लागलेला नाही. गुरुवारी (दि.१२) मार्च दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर सुरू असलेली शोधमोहीम शनिवारी सकाळपर्यंत सुरू असली तरी यशचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नव्हता.

    प्राप्त माहितीनुसार, कासेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीमध्ये शिकणारा यश हा गुरुवारी दुपारी पोहण्यासाठी आपल्या काका व त्यांच्या मित्रांसोबत कासेगाव हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील दगड खाण येथे गेला होता. यशला काठावर बसवून इतरजण पोहण्यासाठी थोड्या अंतरावर गेले असताना काठावर बसलेला यश अचानक पाण्यात पडून बुडाल्याची घटना घडली.

     दरम्यान, घटनेनंतर सुरुवातीला स्थानिकांनी पाण्यात उतरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश सापडला नाही. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारपासून शोधमोहीम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक घोडके, पोलीस निरीक्षक देशपांडे, डब्ल्यू.पी.एस.आय. डोंगरीतोट, सुपे मॅडम, तलाठी हुडेवाले, सर्कल अधिकारी माळी तसेच तहसीलदार किरण जगदाडे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर व एएसआय बाणेवाले आदीं घटनास्थळी उपस्थित होते.

   यशच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले यांच्यासह अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी रावसाहेब मगर, चालक मिलिंद सुरवसे, फायरमन सचिन लोकरे, राजू चिंता, संकेत कुंभार आणि महेश गेंड हे पाण्यात उतरून प्रयत्न करत आहेत. तसेच स्थानिक ओंकार भोजने व सचिन गरड यांच्या कॅमेऱ्यांच्या मदतीनेही पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    दरम्यान, शनिवारी सकाळपासून बोटीच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आल्याचे दिसून आले. पाण्यात खोलवर गळ सोडूनही शोध घेण्यात येत असून उपलब्ध सर्व शक्यता तपासून यशचा शोध सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

५५ मेगा पिक्सेल कॅमेरेच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू 

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील ५५ मेगा पिक्सेल उच्च क्षमतेचा कॅमेरा सुमारे ८० ते १०० फूट खोलवर सोडून तपासणी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सकाळ ते सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू असूनही यशचा शोध लागलेला नाही.

Post Views: 9
Previous Post

रिकर्व्ह प्रकारात सोलापूरचे मुले विजेते, मुली तृतीय 

Next Post

महापालिकेतील लोक अदालतीचा 2 हजार थकबाकीदारांनी घेतला लाभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महापालिकेतील लोक अदालतीचा 2 हजार थकबाकीदारांनी घेतला लाभ

महापालिकेतील लोक अदालतीचा 2 हजार थकबाकीदारांनी घेतला लाभ

ताज्या बातम्या

महिलांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण आवश्यक – डॉ.मेधा पुरव-सामंत

महिलांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण आवश्यक – डॉ.मेधा पुरव-सामंत

March 15, 2026
सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात शुभेच्छांचा वर्षाव

सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात शुभेच्छांचा वर्षाव

March 15, 2026
नगरपरिषदेस पायाभूत सुविधेसाठी 9 कोटी 95 लाख रुपये निधी 

नगरपरिषदेस पायाभूत सुविधेसाठी 9 कोटी 95 लाख रुपये निधी 

March 15, 2026
नियोजन शून्य कारभारामुळे जनतेला स्वयंपाकाच्या गॅस तुटवड्याचा सर्वाधिक फटका

नियोजन शून्य कारभारामुळे जनतेला स्वयंपाकाच्या गॅस तुटवड्याचा सर्वाधिक फटका

March 15, 2026
हॉर्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेणारे डॉ. डिसले यांचे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय येथे मार्गदर्शन

हॉर्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेणारे डॉ. डिसले यांचे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय येथे मार्गदर्शन

March 15, 2026
महिला दिन कार्यक्रमास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

महिला दिन कार्यक्रमास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

March 15, 2026
पंचायत समितीचे नूतन सभापती व उपसभापती यांचा समन्वय समितीतर्फे सत्कार

पंचायत समितीचे नूतन सभापती व उपसभापती यांचा समन्वय समितीतर्फे सत्कार

March 15, 2026
उष्माघातापासून बचावासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांत विशेष कक्ष सुरू

उष्माघातापासून बचावासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांत विशेष कक्ष सुरू

March 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0735106

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697