लातूर – लातूर मधील गांधी चौकातील सिग्नल यंत्रणा नावालाच उभी असल्याचे चित्र दिसत आहे.
या चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.या चौकात सिग्नल यंत्रणा उभी केली पण सध्या ती बंद असल्याने वाहनांची गर्दी होत असून वाहनधारकांना दोन मिनिटे सुद्धा थांबायला वेळ नसतो त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या चौकातील सिग्नल यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा झाली आहे.
फळ खरेदीसाठी ग्राहकाची गर्दी नेहमीच असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक नियंत्रण शाखा याच चौकाच्या जवळ असून सुद्धा वाहतूक शाखेचे याकडे लक्ष नाही. लवकरात लवकर सिग्नल यंत्रणा सुरू करुन वाहतूक सुरळीत चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




















