धाराशिव – वाशी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वाशी येथील वाणी गल्ली ते तहसील रोड व साठे नगर ते बायपास रोड येथील चौकास छत्रपती शाहू राजे यांचे नाव द्यावे.
कारण छत्रपती शाहू राजे हे समाज उधारक होते. तसेच वाशीची जनता छत्रपती शाहू राजे यांना विसरले आहे. ते पुन्हा नागरिकांच्या नजरेत सातत्याने राहील याकरिता सदरील रस्त्यावरील चौकात छत्रपती शाहू राजे चौक म्हणून नाव द्यावे
तशा प्रकारचा बोर्ड नगरपालिकेने लावावा. अशा प्रकारचे निवेदन वाशी शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप क्षीरसागर, दिलीप पवार व इतर कार्यकर्त्यांनी नगरपरिषद मध्ये जाऊन सयाजीराव माने यांना दिले.


























