—————————————-
भोकरदन : राज्य सरकारने जसे इतर समामाजासाठी बार्टी, सारथी, आर्टी, महाज्योती या स्वतंत्र संस्था मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती च्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी( रिसर्च ट्रेनिंग साठी) स्थापन केल्या आहेत,त्याच धर्तीवर मुस्लिम समाजाच्या मुला – मुलींनाही उच्च शिक्षण चांगल्या प्रकारे घेता यावे यासाठी मार्टी (मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्युट) ची स्थापना करण्यात यावी व राज्यभरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून या समाजाचे मागासलेपण घालविण्यासाठी या समाजातील मुलांनाही उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे,
बार्टी,सारथी,आर्टि, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, शैक्षणिक शिष्यवृत्ती, व्यावसायिक शिक्षण, व्यावसायासाठी भागभांडवल, परदेशी शिष्यवृत्ती, कर्जमाफीसारख्या योजना या संस्थेतर्फे राबविल्या जातात याचा फायदा मुस्लिम विद्यार्थ्यांना ही व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.अमर शेख यांनी केली आहे.
तसेच यासंदर्भात मार्टीची स्थापना करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या सच्चर कमिटी, मेहमूद रहमान समिती, रंगनाथ मिश्रा समितीने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या संस्थेची आवश्यकता असल्याचे त्यांच्या अहवालात म्हटले होते, सदरील मार्टी स्थापनेचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेल्यानंतर तो मुस्लीम समाजासाठी स्वतंत्र संस्थेची आवश्यकता नसल्याचे कारण देत व राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल म्हणून हा प्रस्ताव फेटाळला आहे, आमची राज्य सरकारला व आदरणीय मा.ना.उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहेबांना मागणी आहे की,
मार्टीच्या स्थापनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुनर्विचार करावा व मुस्लिम समाजाला न्याय देवून त्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सजग प्रयत्न करावेत, अशा आशयाचे निवेदन विभागीय आयुक्तालयामार्फत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. अमर शेख यांनी निवेदन पाठविले आहे.
Post Views: 17