नांदेड / किनवट : कार्यकर्त्यांच्या शक्ती व एकतेतूंचं निवडणुकीत विजय संपादन करता येते त्यामुळे कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे असे आ. भीमराव केराम यांनी सांगितले. संघटन मंत्री संजय कौडगे यांनी बूथ केंद्र प्रमुख पदाधिकारी यांचा कार्याचा आढावा घेतला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार भिमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली बूथ शक्ती केंद्र प्रमुख यांची बैठक मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष ॲड किशोर देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वागत आयनेनिवार, उमाकांत क-हाळे, सुर्यकांत अरंडकर, किशन मिरासे, संध्याताई राठोड, सुधाकर भोयर, नारायण श्रीमनवार, दिनकर चाडावार, वेंकटराव नेम्मानिवार, राघु मामा, नारायणराव सिडाम, अनिल तिरमनवार, संदिप केंद्रे, आनंद मच्छेवार, दिनकर दहिफळे, गजानन मुंडे पाटील, वेंकट नेम्मानिवार, अजय चाडावार, बाबुराव केंद्रे, विवेक केंद्रे, सागर पिसारीवार, श्रीनिवास नेम्मानिवार, श्रीनिवास यादवराव नेम्मानिवार, सौ. अनुजा पाटील, सागर शिंदे पाटील, धात्रक, गंगु बाई परेकार, सुहासिनी कपाटे, पुनम दिक्षित, राजेंद्र भातनासे, विभिषण पाळवदे, बालकृष्ण कदम , सतिष नेम्मानिवार, बालाजी पावडे, विद्या पाटील, शैलेंद्र तिवारी, अनिरुध्द केंद्रे, मुकुंद नेम्मानिवार यांची उपस्थिती होती.
 
	    	 
                                




















 
                