उमरी ( प्रतिनिधी ) उमरी गिरीष देशमुख गोरठेकर इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थीनी स्वातंत्र्य दिनाच्या प्रभात फेरीत आजचे युवक व्यसनापासून दूर राहावे व व्यसनाच्या आहारी जाऊ नये हा संदेश पथनाट्य चा देखावा करीत दिला आहे .
उमरी गिरीष देशमुख गोरठेकर इंग्लिश स्कूल संलग्नित विद्याभारती ज्यु.कॉलेज उमरी च्या वतिने हा व्यसन मुक्तीचा संदेश शहरातील मुख्यरस्त्यावर पथनाट्य व्दारे युवकांना देण्यात आला आहे
मद्य,बिडी,सिगारेट आदीच्या सेवनाने शरीरावर याचा कसा दुष्परिणाम आणि मनुष्य मृत्यूच्या दारातून परत न येण्याच्या उंबरवठ्यावर जातो. याचा जिवंत देखावा अक्षरशः अंगावर शहारे येणारे प्रात्यक्षिक करून दाखवले आहेत उमरी वासियांना व्यसाना पासून दूर राहण्याचा सल्ला देत व्यसमुक्तीची शपथ घेऊ घातली. हे पथनाट्य मोंढा , नगर परिषद कार्यालय, व्यंकटेशद्वार या ठिकाणी सादर केले. या पथनाटयास उमरी नगर परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी निलम कांबळे , अधीक्षक गणेश मदने, अशोक मामीडवार नगरसेवक प्र., गोविंद अट्टल माजी नगरसेवक,
पारस सेठ दर्डा डी.आर.सी.यु.मेंबर,बी. व्ही चव्हाण,अनिल दर्डा,दिलीप पा.चंदनवार आदी प्रतिष्ठित लोकांनी व मुख्य रस्त्यावरील सर्व प्रेक्षक , पालक व तमाम उमरी वासियाना या व्यसनमुक्ती पथनाट्य पाहून अनेकांनी वाह वाह केली आहे व खरोखरच व्यसना पासून मुक्त राहण्याची शपथ घेतली आहे. या पथनाट्यासाठी शाळेचे इयत्ता ६ते ९ चे विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता पथनाट्य यशस्वीते साठी शाळेच्या शिक्षिका मोगल आवेज बेग, स्वाती अनंतवार ,गायत्री पांचाळ,सारिका इबतेवार,शैलजा अनंतवार, चित्रकला कांबळे, पुजादेवी गिलचे ,शिवानी चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. या नाट्याचा सादरीकरणाचे सर्वांनी व शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वचेवार ,प्राचार्य विश्वजीत देशमुख,संस्थेचे अध्यक्ष डॉ.विक्रम देशमुख यांनी कौतुक केले आहे .