सोलापूर – दि .९ व १० नोव्हेंबर 2025 दरम्यान राजीव गांधी स्टेडिअम, सोलापूर येथे झालेल्या विभागीय तलवारबाजी सर्धेत बी. एफ .दमाणी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले
त्यामध्ये 14 वर्षांखालील गटात बसवराज धनश्री , रणवीर कबाडे, राजमंजुश्री शिंदे, स्वराज घाळे , अपर्णा सिडगिद्दी यांनी रौप्यपदक . पटकावले तर मयूर भोसले प्रांजली कोरे , यांनी सुवर्ण पदक पटकाविले , स्वानंदी ताटे हिने कांस्यपदक पटकावले तसेच 17 वर्षाखालील गटात ज्ञानदा शिरवाळ , प्रथमेश कस्तुरे, यांनी सुवर्णपदक तर अथर्व बारसे याने रौप्यपदक व वेदिका धसाडे , मुजीब शेख, जयवंत चौगुले , यांनी कांस्यपदक पटकावले . 19 वर्षाखालील गटात सई पाटील हिने कांस्यपदक पटकाविले यशस्वी खेळाडूंचे प्रशालेचे स्थानिय अध्यक्ष श्री . कालिदासजी जाजू, सचिवा सौ मंगलजी काबरा, सहसचिव श्री . तापडिया प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ रेखा पेंबर्ती पर्यवेक्षक श्री. राहुल इंगळे यांनी कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . या खेळाडूंना प्रशिक्षक श्री. पवन भोसले तसेच श्री. गणेश म्हमाणे व श्रीमती सोनाली थोबडे यांचे मार्गदर्शन लाभले .


















