श्रीपूर – सध्या शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण सोलापूर जिल्हयात ऊसाला ३५०० रु . दर मिळावा या मागणी साठी आंदोलन चालू आहे . त्या पार्श्वभूमीवर श्रीपूर ता . माळशिरस येथिल कर्मयोगी सुधकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवार दि . १२ डिसें . रोजी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दिपक भोसले , तानाजी बागल, सचिन पाटील , ॲड . दिपकराव पवार , राहूल बिडवे , अमरसिंह माने – देशमुख, गोपाळ घाडगे , माऊली जवळेकर , बाहुबली तावळे , श्रीनिवास नागणे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात कारखान्याचे गाळप बंद पडले सुमारे आठ तास झालेल्या प्रदीर्घ वाटाघाडी नंतर पहिली उचल तीन हजार देण्यावर व्यवस्थापनाने मान्यता दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले . मात्र शेतकरी संघटनेच्या या तीव्र आंदोलनाने अनेक कारखान्यांनी आपली पहिली उचल तीन हजाराचे वर देण्याचे जाहीर केल्याने ऊस दराची कोंडी फुटली आहे .
श्रीपूर येथिल कर्मयोगी कारखान्याच्या काटागेट वरून आंदोलक आत शिरले व ऊसाला ३५०० रु भाव जाहीर करा अशा घोषणा देत गव्हाणी मध्ये उड्या टाकत आंदोलन चालू केले. अचानक झालेल्या या घटते मुळे सर्वत्र काय होते आहे हे कळेना परंतू व्यवस्थापनाचे लक्षात ही घटना येताच कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी घटना स्थळी धाव घेत संबंधीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आंदोलन थांबविणेची विनंती केली . परंतू ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे त्यांनी चेअरमन प्रशांतराव परिचारक यांना या घटनेची कल्पना दिली . त्यानंतर कारखान्याचे व्हा . चेअरमन कैलास खुळे , जेष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे , संचालक तानाजी वाघमोडे हे आंदोलन स्थळी आले व त्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांना नेहमीच पांडुरंग कारखाना शेतकरी हीत जपत आलेला असून यावेळीही समाधानकारक दर देणार असल्याचे सांगितले .
परंतू शेतकरी संघटना किमान पहिली उचल तीन हजार जाहीर करा या मागणीवर ठाम होती .
यावेळी कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी कारखान्याचे ऊस दर , कामगार , व्यापारी देणी , तोडणी खर्च या सर्वांचा विचार करता तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफ . आर . पी पेक्षा कारखाना ऊसास जास्त दर देत असल्याच्या बाबीं कडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले तरीही त्यांचे समाधान झाले नाही . शेवटी रात्री ८ .०० वा चेअरमन प्रशांतराव परिचारक यांना सर्व वृत्तान्त सांगताना शेतकरी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहे म्हटल्यावर प्रशांतराव परिचारक यांनी शेतकरी सभासद हित पाहत तीन हजार रु . पहिली उचल देण्यात संम्मती दिली .
दुपारी १२ वाजले पासून चालू असलेले हे आंदोलन रात्री आठ वाजता संपले व कारखान्याचे बंद पडलेले गळीत व्यवस्थित चालू झाले . यानंतर आंदोलन कर्त्यांनी कै . सुधाकरपंत परिचारक यांनी ज्या प्रमाणे शेतकरी हित जोपासले तेच काम आज चेअरमन प्रशांतराव परिचारक , तसेच उपस्थित असलेले उपाध्यक्ष कैलास खुळे , जेष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे , तानाजी वाघमोडे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी व संचालक मंडळाचे हातून होत असल्याचे सांगत आभार मानत आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले .
व्यवस्थापनाच्या संवेदनशिलतेचा प्रत्येय
कारखान्यावर आंदोलन होत असताना . एकीकडे कारखाना दिर्घकाळ बंद ठेवणे म्हणजे आर्थिक नुकसान , उपलब्ध ऊसाचे वेळेत गाळप ह्या जटील समस्या समोर असताना अत्यंत संयमाने चेअरमन प्रशांतराव परिचारक , डॉ . यशवंत कुलकर्णी , उपाध्यक्ष कैलास खुळे , संचालक दिनकरभाऊ मोरे , तानाजी वाघमोडे यांनी परिस्थिती हाताळत आंदोलक व शेतकऱ्यांच्या भावनांना न्याय मिळवून दिल्याने संवेदनशिलतेला प्रत्येय दिसून आला .
















