परतुर: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार काळुंके व संस्थेच्या सचिव मीनाक्षी काळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा मूळ उद्देश असा होता की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी असणारी भीती दूर व्हावी. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासाविषयी विद्यार्थ्यांनी नेहमी सतर्क रहावे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा दर्जा वाढावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा टिकून राहावी. टॅलेंट सर्च या परीक्षेचा निकाल 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या पावन मुहूर्तावर निकाल घोषित करण्यात आला. गुणानुक्रमे इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. पारितोषिके वितरणाच्या वेळी करियर कट्टा महाराष्ट्र राज्य कमिटी मेंबर डॉ. राजेंद्र उढान, डॉ. पांडुरंग नवल, शैक्षणिक करियर समुपदेशक पेंटू मैसनवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना डॉक्टर उढान यांनी पालकांनी आपल्या पाल्यासाठी मोबाईल कमीत कमी वापरावा यासाठी मोबाईल पार्किंग बनवावी असे सांगितले. डॉ.पांडुरंग नवल यांनी मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्काराची रुजवणूक व्हायला पाहिजे असे सांगितले.पेंटू मैसनवाड यांनी विविध स्पर्धेमधून तसेच पारितोषिकांमधून मुलांमध्ये शिक्षणाविषयीची कशी आवड निर्माण होते हे सांगितले. मुख्याध्यापिका लंका भवर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्याम चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप मुख्याध्यापक अरुण चंदणे, ज्योती खैरे, व्यवस्थापक पुरुषोत्तम मगर, शेषनारायण बिल्हारे, शिक्षक वृंदांमध्ये वैष्णवी तनपुरे, रोहिणी किंगरे, सुरज पहाडे, प्रवीण कुमार दवंडे, नागेश क्षीरसागर, महानंदा व्यवहारे, साधना पाईकराव, मीना मसलेकर, अश्विनी यंदे, शुभम चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.