तभा वृत्तसेवा मुदखेड:
मुदखेड शहरात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी तिसरी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद दि. ०२ मार्च रोजी मोठ्या उस्ताहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम सकाळी ठिक ८:३० वाजता भिख्खू संघाच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.
समता सैनिक दलाच्या वतीने पंचशील ध्वजास सलामी देत जय भीम चे आणि बौद्ध धम्माचा विजय असो अशा घोषणा देत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
यानंतर 9:30 वाजता बौद्ध धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
या रॅलीमध्ये समता सैनिक दलाचे पथसंचलन बौद्ध प्रशिक्षण केंद्र येथून भीम नगर,जुने पोलीस स्टेशन मराठा गल्ली, गुजरी मोहल्ला,मोंढा भागातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी या बौद्ध धम्म रॅलीची सांगता करण्यात आली आहे. यानंतर दुपारी १२:३० वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिसऱ्या धम्म परिषदेचे उद्घाटन डॉ. उपगुप्त महाथेरो पुर्णा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ खेम धम्मो महाथेरो मूळावा,डॉ सत्यपाल महाथेरो संभाजीनगर, पययानंद थेरो लातूर, डॉक्टर इंदवंश महाथेरो औरंगाबाद, भिकुनी चारुशीला थेरी नांदेड, शीलरत्न थेरो नांदेड, पयारतन थेरो,महाकाशप थेरो,भिख्खू गगनबोधी मुदखेड, यांनी उपासक उपासिकांना धम्मदेसना दिली. रात्री ८:०० वाजता प्रा. नितेश कराळे, कवि दंगलकार नितीन चंदनशिवे, समता सैनीक दलाचे मार्शल सारीपुत यांची व्याख्याने झाली.
या धम्म परिषदे निमित्ताने त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. आणि सांगीतले आहे कि आजच्या युवकांनी आंबेडकर चळवळ जिवंत ठेवली पाहिजे आणि चळवळीचा रथ पुढे घेऊन गेला पाहिजे, युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता आय पी एस सी, यूपीएससी, याची तयारी केली पाहिजे. असे प्रमुख व्याख्याते यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी भिमनगर, अशोका नगर, नविअबादी, लुबिंनी नगर, समता नगर, रेल्वे कॉलोनी,भिख्खू संघ बौद्ध तालुक्यातील व शहरातील उपासक,उपासिका, बालक बालिका, जेष्ठ नागरीक व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थीती हाती.