Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा 3 नोव्हेंबरपासून

तरुण भारतbyतरुण भारत
October 17, 2025
in mumbai
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास शासनाने मान्यता दिली असून 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. 2025-26 मध्ये हे स्पर्धात्मक अभियान काही नवीन उपक्रमांसह राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानामध्ये विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण 72 कोटी 22 लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. 

या अभियानासाठी शाळांची विभागणी (अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि (ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर राबविण्यात येईल. 

शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे तसेच शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत. 

या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी 24 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर  हा कालावधी असेल. 3 नोव्हेंबर रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल. तर, 31 डिसेंबर  रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल. 1 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून त्यानंतर अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल. 

*अभियानाचे स्वरूप* 

अभियानात सहभागी होऊन स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधा- 38 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी- 101 गुण आणि शैक्षणिक संपादणूकसाठी- 61 गुण असे एकूण 200 गुण असतील. 

*मूल्यांकन समिती*

अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार असून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी कोकण विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली, वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली तर उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रामध्ये तालुकास्तरावरील मूल्यांकनासाठी प्राथमिक स्तरावर समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावरील मूल्यांकनासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन समिती असेल. जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तर विभाग स्तरावरील मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असेल. तर, राज्य स्तरावरील मूल्यांकनाचे कार्य करण्यासाठी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. 

*पारितोषिके*

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी तालुका स्तरावर प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये, द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये, तृतीय पारितोषिक एक लाख रुपये असेल. जिल्हास्तरावर (मुंबई शहर एक जिल्हा, मुंबई उपनगर एक जिल्हा) प्रथम पारितोषिक अकरा लाख रुपये, द्वितीय पारितोषिक पाच लाख रुपये, तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये असेल. तर, महानगरपालिका स्तरावर प्रथम पारितोषिक 21 लाख रुपये द्वितीय पारितोषिक 15 लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक अकरा लाख रुपये असेल. वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रासाठी देखील पारितोषिकांची रक्कम याचप्रमाणे राहील.

उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये, द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये, तृतीय पारितोषिक एक लाख रुपये असेल. जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक 11 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक पाच लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये असेल. विभागस्तरीय प्रथम पारितोषिक 21 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 15 लाख रुपये तर तृतीय पारितोषिक 11 लाख रुपये असे असेल. 

राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी प्रथम पारितोषिक 51 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 31 लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक 21 लाख रुपये असेल. पारितोषिकांची एकूण रक्कम 72 कोटी 22 लाख रुपये इतकी असेल. 

Post Views: 46
Previous Post

गेट वेल सून खा. प्रणिती शिंदे… भाजपचे अनोखे आंदोलन

Next Post

सहकार शिरोमणीच्या सभासदांना दिपावली निमित्त्‍ साखर वाटप सुरु

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सहकार शिरोमणीच्या सभासदांना दिपावली निमित्त्‍ साखर वाटप सुरु

ताज्या बातम्या

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

युवा पॅंथर संघटनेच्या वतीने नूतन महापौर उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला.#सोलापूर #महानगरपालिका

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679671

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697