पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील बस स्थानकावरील महामार्गाच्या कामाचे जवळपास सात वर्षांपुर्वी काँक्रिटीकरण झाले आहे. याठिकाणाचे गटारीचे काम अद्यापपर्यंत अपुर्णच आहे.डिव्हायडरचे कामही अद्यापही अपुर्ण आहे.या डिव्हायडरमधये वृक्षारोपण केलेले नाही तसेच याठिकाणी विजेचे खांब उभे केले आहेत माञ ते अद्यापपर्यंत सुरूच नाहीत.याठिकाणी बसस्थानक परिसरात शाळा ,पोलीस स्टेशन व मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत यामुळे याठिकाणी कायमस्वरुपी म्हणजेच अगदी राञं दिवस वर्दळ असते.
तरीही याठिकाणी स्पीड ब्रेकरसुदधा नाहीत. यामुळे याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. याठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील पाचवी ते आठवीपर्यंतचे जवळपास एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनचे शाळेत येणे जाणे बसस्थानकरुनच असते पण स्पीड ब्रेकर नसल्यामुळे याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. साळमुख ते पिलीव या दरम्यानच्या तिन पुलांची कामे तसेच रस्त्याची कामे अपूर्ण आहेत याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत.
निरा उजव्या कॅनाल वरील पुलाचा संरक्षक कठडा तुटून गेल्यामुळे आतापर्यंत अनेक वाहने कॅनाल मध्ये पडली आहेत. तर पिलीव बसस्थानक वर व्यावसायिकांनी दोन्ही बाजूस अतिक्रमण केले आहे यामुळे बसस्थानकावर वावरणे अक्षरश मुश्कील झाले आहे.ते अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे.या सर्वच समस्यांबाबत संबंधित खात्याकडे वारंवार नागरिकांनी तक्रारी करुन देखील संबंधित खात्याने नागरिकांच्या मागण्यांना केराची टोपलीच दाखविली आहे.
यामुळे सध्या पिलीव परिसरातील नागरिक प्रचंड आक्रमक झाले असुन येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास किंवा योग्य ती कार्यवाही न झाल्यास आम्ही बसस्थानकावरच रास्ता रोको करणार असुन कोणत्याही पररस्थितीत आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा पिलीव परिसरातील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.




















