अक्कलकोट – स्वामी समर्थ महाराज मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली मंदिर समितीचे हे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने चालत आहे, ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. म्हणून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्य आपणास आदर्शवत वाटत असल्याचे मनोगत सोलापूर येथील इंडीयन मॉडेल स्कूल ग्रुपचे संस्थापक अमोल जोशी यांनी व्यक्त केले.
अमोल जोशी व संस्थेच्या संचालिका तथा अमोल जोशी यांच्या सुविद्य पत्नी सायली जोशी यांनी
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट दिली श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. . याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी अमोल जोशी व सायली जोशी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी अमोल जोशी बोलत होते.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, नंदकुमार गोसावी, संजय शिंदे, सागर गोंडाळ, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.






















