सांगोला – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्ञ विद्यापीठ लोणेरे (रायगड) अंतर्गत झोनल स्तरावरील खो-खो स्पर्धा सोलापूर येथील ए जी पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले. तसेच सिद्धार्थ उपासे या विद्यार्थ्यांला सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून सन्मानचिन्ह देऊन मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले.
या खेळासाठी क्रीडा शिक्षक प्रा.बिरा वगरे, प्रा.मोहन वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा नीलवर्णा रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ.अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा.प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ.रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांनी अभिनंदन केले.

















