सांगोला – ज्याप्रमाणे राज्य सरकारमध्ये भाजप व शिवसेना यांची युती आहे त्याचप्रमाणे सांगोला नगरपालिका निवडणुकीत शेकाप बरोबर युती न करता शिवसेनेबरोबर युतीची गरज होती अशी खंत सांगोल्यातील जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. यावेळी भाजपचे शिवाजीराव गायकवाड, राजश्री नागणे, नवनाथ पवार, नागेश जोशी, वैजयंती देशपांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने पूर्ण पॅनल उभा करण्याची गरज होती. तसेच ज्याप्रमाणे नुकत्याच प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली त्याचप्रमाणे जुन्या कार्यकर्त्यांचा ही उमेदवारी देताना पक्षाने विचार करण्याची गरज होती. नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या उमेदवाराला कमळ चिन्ह मिळाले परंतु नगरसेवक पदासाठी उभारलेल्या भाजपच्या उमेदवारांना कमळ चिन्ह मिळाले नाही त्यामुळे मोठे नुकसान झाले अशी खंत यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केली.

























