मुदखेड / नांदेड – मुदखेड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दि.२ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार आहे भाजपाकडून विश्रांती माधव कदम आणी काँग्रेसकडून शीला राजबहादुर कोत्तावार हे निवडणूक रिंगणात असून यांच्यातच अटीतटीची निवडणूक होईल असे जनतेतून बोलल्या जात आहे या निवडणुकीत भाजपा काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गट, बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी एम आय एम. माजी नगराध्यक्ष मुजीब जागीरदार यांनी देखील आपल्या मुलीचा उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी दाखल केली आहे.
भाजपा व काँग्रेसमध्ये उमेदवारी देण्यावरून बरेच मतभेद झाल्याचे दिसून आले काही निष्ठावंतांना डावळण्यात आले तर या पक्षातून त्या पक्षात गेलेल्या उमेदवारांना उमेदवारी नगरसेवक पदासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदापासून ते नगरसेवक पदापर्यंत अपक्षाची गर्दी अजून तरी कायम आहे.

दि.२१ डिसेंबरला अर्ज मागे घेतल्यानंतरच या निवडणुकीत कोण रिंगणात राहतील हे चित्र दिसून येईल असे असले तरी ही निवडणूक म्हणजे भाजपा.खासदार अशोक चव्हाण, काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे आमदार, प्रताप पाटील चिखलीकर हे या निवडणुकीत लक्ष घालून प्रतिष्ठा पणाला लावतील असे जाणकाराचे मत आहे.
मुदखेड मध्ये मुस्लिम समाजाची मतदार संख्या सर्वात जास्त असून त्या पाठोपाठ दलितांची मतदार संख्या आहे या निवडणुकीत ह्याच दोन समाजाचे मते निर्णायक आहेत ते जिकडे जातील तेच नगराध्यक्ष होऊ शकते हे मात्र निश्चित.

















