कुंडलवाडी (प्रतिनिधी) कुंडलवाडी शहरात दि.२/०३/२०२५रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून कुंडलवाडी पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
कुंडलवाडी येथील मुख्य बाजार पेठेतील मैनोद्दिन मगदूम शेख व बाबा चुडीवाले यांनी नेहमी प्रमाणे आपली दुकाने उघडण्या साठी दि.३/३/२०२५ रोजी सकाळी आले असता दुकानाची कुलपे तुटलेली दिसुन आली लगेच पोलीस स्टेशनला महिती दिली असता पोलीस स्टेशनचे पोलिस निरक्षक ज्ञानेश्र्वर शिंदे यांनी यांनी भेट देऊन दोन्ही दुकानाची पाहणी केली.
शेख मैनोद्दीन मगदूमसाब भूसार दुकान
यांनी काऊंटर मधील पन्नास हजार रूपये नगदी चोरट्या नी नेले असल्याची तक्रार कुंडलवाडी पोलिस स्टेशन मध्ये दिली तसेच रहीम किराणा दुकानातून चोरट्यानी नगदी (चिल्लर)आठ हजार रूपये चोरल्याचे तक्रार बाबा यांनी केले त्या वरून कुंडलवाडी पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी सी. सी. फुटेजच्या साह्याने तपास करीत आहेत.