सांगोला – कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत सांगोला महाविद्यालयातील मुलींच्या संघाने उल्लेखनीय खेळ करून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. विद्यापीठ संघात निवड केलेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव ऍड.उदयबापू घोंगडे, संघास मार्गदर्शन करणारे प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले व क्रीडा शिक्षक प्रा.जगदीश चेडे यांनी संघात सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. याप्रसंगी प्राध्यापक वर्ग, क्रीडा समिती सदस्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























