हदगाव तालुका प्रतिनिधी :-
श्री. सुभाष शुगर प्रा. लि. हडसनी ता. हदगाव व शिऊर साखर कारखाना म. वाकोडी ता. कळमनुरी या दोन्ही कारखान्यांमध्ये स्वतंत्र्याच्या दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांच्या मुलांपैकी गुणवंत विद्यार्थ्यांचा कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने प्रशस्तीपत्र व रोख रक्कम आणि साखर बॅग देऊन गौरव करण्यात आला तर या गौरव वितरणाचे यंदाचे हे चौथे वर्ष होते.
स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त श्री. सुभाष शुगर या साखर कारखान्याच्या प्रांगणात दीपक शंकरराव पवार ( टर्नर ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच शिऊर साखर कारखाना वाकोडी ता. कळमनुरी येथे शेख सय्यद शेख वाहिद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला श्री. सुभाष शुगर कारखाना हडसणी व शिऊर साखर कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांच्या संकल्पनेतून आपल्या कारखाना कर्मचाऱ्यांच्या मुला-मुली पैकी जे विद्यार्थी दहावी व बारावी मध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले
त्यांना प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्याची सलग चार वर्षाची परंपरा कायम राखली आहे. या गौरव सोहळयात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, रोख ५००० रु. आणि साखर बॅग देऊन सन्मान करत असतात त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री सुभाष शुगर कारखानाच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात जनरल मॅनेजर राजेश मानधना , मधुकर पतंगे, हेडे, गीते, अविनाश सूर्यवंशी, गावंडे ,शेतकी अधिकारी किशोर वानखेडे तसेच शिऊर साखर कारखाने येथे पण त्याचप्रमाणे कार्यक्रम पडला यावेळेस जनरल मॅनेजर संभाजी नातू ,सोमापा, दोन्ही कारखान्यात सदरील कार्यक्रमाच्या वेळी सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार उपस्थित होते.