सोलापूर : पाठीमागून रिक्षा चालकाने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले. हा अपघात सोलापूर मोहोळ रस्त्यावरील आर के हॉटेलसमोरील रस्त्यावर रात्री 7.30 वाजता गुरुवारी घडला.
विकी नरसिंग पागे (वय 29), राजेश यलप्पा म्हेत्रे (वय 33) व विकी सालोमन शेट्टी (वय 35, सर्व रा. मोदी खाना) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. वरील तिघे गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता मोहोळ तालुक्यातील वडवळ येथून सोलापूरकडे दोन दुचाकीवरून येत होते. कोळेगावपासून काही अंतरावरील आर के हॉटेलसमोरील रस्त्यावर पाठीमागून आलेल्या रिक्षा चालकाने धडक दिली. त्यात खाली पडून तिघे जखमी झाले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.