मंगळवेढा – तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्याची घोषणा शासनाने अनेक दिवसांपूर्वी केली असली तरी प्रत्यक्षात आजपर्यंत रविवार पर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी “काळी दिवाळी” साजरी करन्याची वेळ आली आहे.दरम्यान पैसे खात्यावर येऊ लागल्याचे खाेटे वृत देऊन वाहवा मिळवन्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
मुसळधार पावसामुळे मंगळवेढा तालुक्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली. सोयाबीन, बाजरी, तूर, मका यांसारख्या हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महसूल विभागाकडून पंचनामेही पूर्ण झाले आहेत, मात्र मदतीचे पैसे खात्यावर जमा होण्याचे नाव घेत नाहीत.
शासनाने “प्रभावित शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत दिली जाईल” अशी आश्वासने दिली होती, परंतु ती केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, खत-बियाण्याचे कर्ज, घरखर्च आणि सणाच्या तयारीचा भार त्यांच्या डोक्यावर आहे.शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. “शासन निर्णय झाला आहे, निधीही मंजूर आहे, तरी वितरणात विलंब का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या मोबाईलवर अजूनपर्यंत कोणताही मेसेज किंवा रक्कम जमा झाल्याची नोंद दिसलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाला ऊत आला आहे.तातडीने मदतीची रक्कम खात्यावर जमा करावी.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अद्ययावत यादी जाहीर करावी. प्रलंबित पंचनाम्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी. शासनाने आता तातडीने पावले उचलली नाहीत, तर शेतकरी संघटनांकडून तसेच विरोधकाकडुनआंदोलनाची चेतावणी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.