अक्कलकोट – आयुर्विज्ञान रोगोपचाराचे शास्त्र नसून निरोगी, संतुलित आणि दीर्घ आयुष्य कसे जगावे हे सांगणारे शास्त्र आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट यांसारख्या महान ऋषींनी सुद्धा आपल्या ग्रंथांमध्ये आयुर्विज्ञानास प्रमाण मानले आहे, म्हणून नागरिकांनी निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदातील तत्वांचे पालन केले पाहिजे, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक मराठी व सेमी इंग्लिश विभागाच्यावतीने आयुर्विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, जुनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी इंग्लिश विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शरीरात वात, पित्त आणि कफ हे आजार उद्भवतात, त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीचा आहार, विहार व उपचार बदलतो. त्यामुळे
“जसा आहार तसा विचार आणि तसा आचार” असे आयुर्विज्ञान सांगते औषधोपचारांसोबत पंचकर्म, योग, ध्यान, प्राणायाम आणि नैसर्गिक जीवनशैली यांना महत्त्व दिले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिगंबर जगताप यांनी केले, सूत्रसंचलन निशिगंधा सोमेश्वर यांनी केले आभार कल्पना स्वामी यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुर्यकांत रूगे , मनिषा सुरवसे, रविकिरण दंतकाळे, दिगंबर जगताप, प्रा सलोनी शहा, शितल टिंगरे, प्रतिभा माने, यांनी प्रयत्न केले.
प्रदर्शनातील कलाकृतीचे नागरिकाकडून कौतुक
दोन दिवसाच्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पारंपारिक सेंद्रिय शेती आणि आधुनिक शेती यातील बदल, शिवकालीन खेडे, इस्त्रोचे माहिती पट, आयुर्वेदाचे महत्त्व, योगिक दिनचर्या,घनकचरा व्यवस्थापन, स्वदेशी सौंदर्यप्रसाधने, पशुपक्षांची घरटे, प्राणी व वनस्पतींचे प्रकार आदी कलाकृती उत्तम रित्या साकारल्या होत्या. प्रदर्शनातील कलाकृती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती, त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले प्रदर्शनातील विशेष आकर्षण
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक ऐतिहासिक वारसा यादीत निवड केली म्हणून विद्यार्थ्यांनी संकुलाच्या प्रांगणात 12 गड व किल्ल्यांची प्रतिकृती साकारली होती.
पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील आयुर्विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर

























