सोलापूर – दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री महाराष्ट्रात ज्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरे होते, त्याच दिवशी बंगालमध्ये कालीमातेची पूजा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. हाच धार्मिक उत्साह आणि परंपरेचा वारसा सोलापूरातील बंगाली बांधवांनी आजही जपला आहे.
गंगा नदीतील पवित्र मातीपासून बनवलेल्या महाकालीच्या मूर्तीची स्थापना करत तिन्ही दिवसांचा कालीपूजन महोत्सव सोलापुरात शिवानुभव मंगल कार्यालय येथे साजरा केला जातो . लाल जास्वंद, धूप, दीप, नेवैद्य, फुले आणि मंत्रोच्चारांच्या गजरात देवीची आराधना करण्यात येते. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री तंत्रपूजन व पारंपरिक विधींच्या माध्यमातून कालीमातेची ऊर्जा आणि रक्षणशक्ती जागृत केली जाते.
“ही पूजा आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. गंगामातीपासून तयार झालेली कालीमाता ही शक्ती, संरक्षण आणि विनाशाच्या माध्यमातून सृष्टीच्या संतुलनाचं प्रतीक असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.
महोत्सवाच्या अखेरीस मोठ्या उत्साहात देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. शहरातील बंगाली बांधवांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपत सोलापुरात ‘कालीपूजन’चा दिव्य सोहळा उभा केला आहे.




















