करकंब : करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पर्यावरणप्रेमी सागर कुंजीर यांची अकलूज येथे बदली झाली.त्यानिमित सागर कुंजीर यांचा सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम,एकलव्य अभ्यासिका,युगंधर आखाडा व शिवराज्य संघटनेच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.यावेळी नंदलाल कपडेकर यांनी प्रास्ताविक करताना सागर कुंजीर यांनी करकंब परिसरातील झाडांचे संवर्धन करण्यासाठी अनमोल असे सहकार्य केले.
अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर यांनी सागर कुंजीर यांच्या प्रयत्नामुळेच करकंब गावच्या लेकीचं झाड अभियानांतर्गत करण्यात आलेले वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन पाहण्यासाठी भेट दिली होती.या भेटीमुळे करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीममध्ये आणखीन जोमाने काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली असे मनोगत व्यक्त केले.
ज्ञानेश्वर दुधाणे,पांडुरंग काटवटे,रमेश खारे,प्रमोद रेडे पाटील,हरिश्चंद्र वास्ते,राजू अनवत यांनीही सागर कुंजीर यांचे निसर्गावर असणारे प्रेम तसेच करकंब व करकंब परिसरातील नागरिकांना त्यांनी लावलेली शिस्त करकंबकरांना कायमच स्मरणात राहील अशी मनोगते व्यक्त केली.
झाडे लावणे सोपे आहे परंतु त्यांचे संगोपन करणे,वाढवणे अतिशय कष्टदायी आहे.परंतु झाडांचे संवर्धन करणे,त्यांची निगा राखण्याचे काम करकंब गावच्या लेकीच झाड अभियान टीम करत आहे.मी त्याचा साक्षीदार आहे.युगंधर आखाडा आणि शिवराज्य टीमचेही काम उल्लेखनीय असून करकंबमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध टीमला शुभेच्छा देतो.
सागर कुंजीर. सहाय्यक पोलीस निरीक्षक, करकंब पोलीस स्टेशन.
आभार संतोष भोसले सरांनी मानले.यावेळी विश्वजीत शिंदे,बापू खारे,देविदास काटवटे,नागेश खारे,चेतन पुरवत, विशाल बोधे,पिनू देशमुख,अक्षय नगरकर,विशाल बोधे,गणेश पिसे, धोंडीराम भाजीभाकरे,पृथ्वीराज धोत्रे,अमोल खारे आदी वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























