तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीत पेडदर्शन आणि धर्मदर्शन बंद राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
सध्या श्री तुळजाभवानी मंदिर व शहर विकास आराखड्यासाठी केंद्र शासनाकडून प्रसाद योजनेतून 1860 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याअंतर्गत मंदिर संस्थानच्या स्वनिधीतून 58 कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून सिंहासन गाभार्यात पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचे काम होणार आहे.
1 ऑगस्टपासून 10 ऑगस्टपर्यंत गाभार्यातील काम सुरू राहणार असल्याने या कालावधीत भाविकांना पेडदर्शन आणि धर्मदर्शन उपलब्ध राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तथापि, दैनंदिन धार्मिक विधी, अभिषेक, सिंहासन पूजा आणि मुखदर्शन हे मात्र नियमितपणे सुरू राहतील, असे मंदिर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले. भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...