तभा फ्लॅश न्यूज/प्रतिनिधी : उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे शासन निर्देशानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांच्या मार्गदर्शना खाली 101 झाडांचे वृक्षारोपण करुन रुग्णालय परिसरात नव संजीवनी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. यामध्ये पर्यावरण पूरक व मनमोहक फुलाची झाडे लागवड करण्यात आली आहे. या झाडांच्या जतानासाठी उंच लोखंडी जाळीचे कुंपण चहुबाजूंनी तयार करण्यात आले आहे.
वेंकटेश्वरा हिरो शोरुम यांच्या च्या वर्धापनदिनानिमित्ताने प्रमोद चौधरी यांच्या वतीने 51 वृक्ष आणि 50 वृक्ष वैद्यकीय अधीक्षक देवणीकर तसेच डॉक्टर्स व कृष्णा डायग्नोस्टीक सेंटर या सर्वांच्या सौजन्याने उपलब्ध झाली.
यावेळी वैधकीय अधीक्षक, औषध निर्माण विभाग यांचे कर्मचारी , शहरातील पर्यावरण प्रेमी , डॉक्टर्स, शो रूम कर्मचारी , देगलूर शहर स्वच्छतेचा जागर ग्रुप पदाधिकारी व शहरातील सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व 101 वृक्षाचे वृक्षरोपण करून जतन करण्याचा संकल्प केला.भविष्यात हे उद्यान शहराच्या तसेच जिल्हा रुग्णालयाच्या सौंदर्यात भर घालणारे शुध्दऑक्सिजन युक्त हवा देणारे , पर्यावरणास पूरक व रुग्णालय परिसरात आनंददायी वातावरण निर्माण करणारे, ग्रीष्मकालीन जीवघेण्या उष्णते मध्ये शितलतेचे वरदान देणारे असेल असे मत व्यक्त करण्यात आले.