हिंगोली – शिरड शहापूर ग्रामपंचायत हद्दीत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून या कुत्र्यांमुळे लहान मुलांपासून महिलांपर्यंत अनेकजण भयभीत झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलं, वृद्ध आणि महिलांना दुखापती झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, स्थानिक प्रशासनाने अद्याप मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही.
जर लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर वंचित बहुजन आघाडी शिरड शहापूर येथे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


















