मोहोळ – सोलापूर पुणे महामार्गावर सावळेश्वर टोल नाक्यावर ट्रक चालकास टोल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली . यामुळे वाहन चालक गंभीर जखमी झाल्याने चिडलेल्या वाहन चालकांनी एकत्र येऊन रास्ता रास्ता केला यामुळे बराच काळ हायवेवरील वाहतुक खोळंबली .
सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर कर्मचाऱ्याकडून टोल वसुलीसाठी बऱ्याच वेळा दादागिरी केली जाते अशी चर्चा आहे . वाहन चालकांना मारहाणी केली जाते . या घटना सातत्याने घडत आहेत . *मात्र भीतीपोटी याविषयी तक्रार दाखल होत नाही * मंगळवारी दि. २४ मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास असाच टोल देणे घेण्यावरून सिद्धू स्वामी (रा.बसवकल्याण ) हा ट्रक चालक आपली ट्रक घेऊन सोलापूर कडे निघाला होता . सावळेश्वर टोल नाक्यावर आल्यावर तो चालक व टोल कर्मचारी यांच्यामध्ये वाद झाला . टोल कर्मचाऱ्यांनी वाहन चालकास बेदम मारहाण केली . या मारहाणीत तो वाहन चालक गंभीर जखमी झाला, रक्तबंबाळ झाला यामुळे आजूबाजूला थांबलेले वाहन चालक हे सर्वच चिडले आणि या टोळ कर्मचाऱ्यांच्या दादागिरीच्या विरोधात एकत्र येऊन सोलापूर पुणे महामार्गावर रस्ता रोको करण्यास सुरुवात झाली. या रास्ता रोको दरम्यान तीन ते चार किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या तर काही चिडलेल्या वाहनचालकांनी आणि जमलेल्या जमावाने ही टोल नाक्यावर तोडफोड केल्याचेही दिसून आले. सिद्धू स्वामी वय ३२( रा बसवकल्याण) असे जखमी वाहन चालकाचे नाव असल्याचे समजते मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्याच पायाला मल्टिपल फ्रॅक्चर झाले असल्याची समजते . *तो गंभीर जखमी झाल्यामुळे* पुढील उपचारांसाठी त्यास सोलापूर येथे पाठवण्यात आलेअसल्याची प्राथमिक माहिती आहे
*दरम्यान रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. त्याचबरोबर या टोलनाक्याच्या सोलापूरकडच्या बाजूला नेहमी महामार्गाचे वाहतूक पोलीस असतात . ते येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत असतात. ते यावेळी कोठे होते ? त्यांनी या प्रकरणी काय केले ?असा सवाल निर्माण झाला आहे*
*घटनेची माहिती समजल्यानंतर मोहोळचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, पोलीस गुप्त वार्ता विभागाचे गजानन माळी आणि अन्य सहकार्याने तातडीने टोळ नाक्याच्या ठिकाणी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करून नागरिकांना दिलासा दिला*
हा टोल दुपारी ३ ते ६ पर्यंत फ्री चालू होता .दरम्यान दोन्ही बाजूला दोन – दोन किलोमीटरची वाहनांची रांग लागली होती .राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात आले . दरम्यान टोल नाक्यावर मोठा पोलिस फौजफाटा दिसत होता.
सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण प्रकरणी सर्व चालकांनी रास्ता रोको केल्याने टोल*बुथजवळ गर्दी दिसत आहे

























