सोलापूर – ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या सामाजिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक योगदानाचा उल्लेख केला. त्यांनी आपल्या भाषणात सत्य, न्याय, सेवा, समता आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या या परंपरेचे महत्त्व बापूसाहेब देशमुख, योगिनाथ बिराजदार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सांगितले.
शहराचे आराध्य दैवत, भक्तांच्या श्रद्धेचे व आस्थेचे केंद्रस्थान असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पावन प्रतिमेचे पूजन सोलापूर बार असोसिएशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत भक्तिभावाने, श्रद्धेने आणि परंपरेनुसार 14 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सोलापूर बार असोसिएशन हॉल येथे संपन्न झाले.
या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे संपूर्ण बार परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. धार्मिक परंपरा जपणारा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम सोलापूर बार असोसिएशनच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक जडणघडणीचा अविभाज्य भाग असल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आले. या पवित्र पूजन समारंभास सोलापूर जिल्ह्याचे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. तसेच सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सध्या ठाणे येथे कुटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले अमित आळंगे साहेब हे देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
या वेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख, सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे, सहसचिवा: ॲड. मीरा प्रसाद, खजिनदार ॲड. अरविंद देडे यांच्यासह बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे विद्यमान सदस्य मिलिंद थोबडे यांचीही विशेष उपस्थिती होती. तसेच बारचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य ॲड.विश्वनाथ आळंगे, ॲड.एस. आर. पाटील, ॲड.एन. आर. खंडाळ, ॲड.एस. व्ही. उजळंबे, ॲड.बसवराज सलगर आदी ज्येष्ठ व युवा वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















