मुदखेड ता प्र
डोनगाव ता मुदखेड येथील गावठाण डीपीच्या शेतातील विजेच्या तारा तुटल्याने महावितरणचा हलगर्जीपणा पुढे आल्यामुळे लक्ष्मण शंकरराव हामंद यांच्या दोन म्हशी विजेचा शॉक लागल्याने दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मुदखेड तालुक्यात सर्वत्र बोंबाबोंब उठली आहे. डोणगाव येथिल गावातील खांब व विजेचे तार नव्याने जोडणी करण्यात आली आहे. परंतु संबंधित गुत्तेदाराने आरतींग साठी जुन्याच तारांचा वापर करून थातुरमातुर काम पूर्ण केले आहे. गावठाण डीपी वरील तारा बदलूनही तुटण्याचे प्रकार सातत्याने घडतच आहेत. बाबुराव गावठाण डीपीच्या बाजूलाच लक्ष्मण शंकर हामंद यांचे शेत आहे. याच गावठाण रोहित्री वरून त्यांच्या शेतावर वीज पुरवठा केला जातो.
याच डीपी वरील शेतातील विजेच्या तारा अचानक तुटून म्हशीच्या अंगावर पडल्याने यामध्ये दोन म्हशी जागीच दगवल्याची दुर्दैवी घटना दि.९ ऑगस्ट रोजी घडली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे दोन लक्ष रुपये नुकसान झाले आहे. संबंधित घटनेचा पंचनामा केला असून महावितरणकडे नुकसानभरपाईसाठी माधव हामंद यांनी धावही घेतली आहे.
प्रतिक्रिया —
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आज दोन म्हशी दगावल्या असून त्यामुळे दोन लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित महावितरणने हे नुकसान भरून द्यावे, अन्यथा कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे.
माधव हामंद डोनगावकर